Chakan : स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील शिंदे याच्यासह त्याच्या नऊ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. चाकण परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.

टोळी प्रमुख स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदे (वय 28, रा. चाकण), नितीन उर्फ सोन्या राजाराम आगरकर (वय 20),  समाधान उर्फ सोन्या सुरेश अवताडे (वय 21),  रोहन महेंद्र घोगरे (वय 23), मोनेश संजय घोगरे (वय 18), प्रतीक शाम सोनवणे (वय 18), राहुल शहादेव माने (वय 20), संदीप अरुण शिंदे (वय 42) रविकिरण ऊर्फ आप्पा शेखर कळसकर अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संकेत गाडेकर (वय 20, रा. चाकण) हे त्यांचे मित्र शंकर उर्फ सलमान व सौरभ राठोड यांच्यासोबत चाकणमधील खंडोबा माळ येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी  वरील आरोपी आणि त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांनी मिळून संकेत गाडेकर यांच्यावर कोयत्याने वार केले. वार चुकवून पळून जात असताना सर्व आरोपींनी मिळून संकेत गाडेकर यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये संकेत जखमी झाले. घातक हत्यारे घेऊन रस्त्याने पाठलाग करताना पाहून दहशतीचे वातावरण तयार झाले. हा गुन्हा स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

स्वप्नील शिंदे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण करून मारणे, जबरी चोरी, गर्दी, मारामारी तसेच बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीतील साथीदार समाधान आवताडे याच्यावर खुनाचा प्रयत्न, पोलीस रखवालीतून पलायन, जबरी चोरी असे तीन गुन्हे दाखल आहेत. मोनेश याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. रोहन मोगरे याच्यावर मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रतीक सोनवणे याच्यावर दंगा, दुखापत, रविकिरण कळस्कर याच्यावर दरोडा, मारहाण, दंगा असे गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यासाठी चाकण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे दिला. अपर आयुक्तांनी आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलिस कर्मचारी सचिन चव्हाण, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like