Nigdi : बांधकाम व्यावसायिकाकडून विनयभंग; पीडितेच्या पतीला मारहाण

एमपीसी न्यूज – नवीन फ्लॅट घेण्यासाठी वीस टक्क्यांहून अधिक आगाऊ रक्कम भरली. परंतु ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट नावावर करून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बांधकाम व्यावसायिकाने विनयभंग केला. तसेच त्यांच्या पाटील मारहाण केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी विष्णुविहार गृहप्रकल्पाचे साईडऑफिस जाधववाडी चिखली येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णुविहार गृहप्रकल्पामध्ये फिर्यादी यांनी दहाव्या मजल्यावर एक टू बीएचके फ्लॅट बुक केला. त्यावेळी फिर्यादी यांनी बांधकाम व्यावसायिकाला रोख रक्कम आणि चेक असे एकूण 16 लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले. ही रक्कम फ्लॅटच्या किमतीच्या 20 टक्क्यांहून अधिक आहे. तरीही बांधकाम व्यावसायिकाने फिर्यादी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. तसेच फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यामध्ये नऊ लाख रुपये परस्पर जमा केले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्यांच्या पतीसह बांधकाम व्यावसायिकाच्या चिखली येथील कार्यालयात गेल्या. फिर्यादी यांनी बांधकाम व्यावसायिकाला झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता त्याने फिर्यादीसोबत अश्लील वर्तन केले. तसेच बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील काही लोकांनी मिळून फिर्यादी यांच्या पाटील मारहाण केली. तसेच अश्लील भाषा वापरत धमकी देखील दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.