Pimpri : कर्मचारी महिलेचा संस्थापकाकडून विनयभंग; संस्थापकाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – संस्थाचालक, संस्थापक यांच्याकडून संस्थेत काम करणा-या महिलांचे विनयभंग, शरीरसुखाची मागणी करणे अशा घटना शहरात थोड्या-अधिक फरकाने वारंवार घडत आहेत. पिंपरी येथील एका नामांकित संस्थेच्या संस्थापकाने संस्थेतील कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 39 वर्षीय कर्मचारी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मोशी येथील एका नामांकित संस्थेत अकाउंट पदावर काम करत आहेत. संस्थेच्या संस्थापकाने 20 जुलै रोजी कामानिमित्त महिलेला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. महिला केबिनमध्ये आल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. यामुळे महिलेने संस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.