BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : शेजा-यांच्या घरी पूजेसाठी आलेल्या पाहुण्यांशी हुज्जत घालत महिलेचा विनयभंग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शेजाऱ्यांच्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी आलेल्या पाहुण्यांशी दुसऱ्या शेजाऱ्याने हुज्जत घातली. तसेच त्याने एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास लांडेवाडी येथे घडली.

राजेश कनोजिया (वय 36, रा. लांडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या शेजारी सत्यनारायणाची पूजा होती. त्या पूजेसाठी शेजार्‍यांचे पाहुणे घरी आले होते. पूजा संपल्यानंतर पाहुणे घराबाहेर उभे राहिले. त्यावेळी राजेश याने त्या पाहुण्यांशी हुज्जत घातली. तसेच राजेश फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून आला. उगाच वाद नको म्हणून महिलेने घराचा दरवाजा बंद केला. परंतु राजेशने जबरदस्तीने दरवाजा ढकलून महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.