Wakad : दांडियात 14 वर्षीय मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – नवरात्रौत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या रास – दांडिया कार्यक्रमात दोन तरुणांनी 14 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्ये करत विनयभंग केला. हा प्रकार थेरगाव कैलासनगर येथे घडला.

या प्रकरणी आकाश बाबासाहेब गायकवाड (वय 19, रा. एकता कॉलनी, धनगरबाबा मंदीरामागे, थेरगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार पसार आहे. याबाबत 14 वर्षीय मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कैलासनगर येथे आर. एम. ग्रुप नवरात्र उत्सव मंडळातर्फे रास-दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास पीडित मुलगी मंडळाच्या कार्यक्रमात दांडिया खेळायला गेली होती. ती दांडिया खेळत असताना आरोपी आकाशसह त्याचा साथीदार तिच्या जवळ आला. तिचा हात पकडत आकाशने तिला ‘तू खूप सुंदर दिसते, मला तू हवी आहे, असे म्हणत विनयभंग केला. या प्रकारानंतर भेदरलेल्या मुलीने कुटूंबीयांना हा प्रकार सांगून तात्काळ पोलीसात धाव घेतली. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.