Hinjawadi : उधार घेतलेल्या खेकड्यांचे पैसे मागताना महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – उधार घेतलेल्या खेकड्यांचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाने महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार बुधवारी (दि. 31) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी गोविंद गोपाल माने (वय 29, रा. कासारसाई, ता. मुळशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद कासारसाई येथे मासेमारीचा व्यवसाय करतो. फिर्यादी महिलेने गोविंद याच्याकडून 100 रुपयांचे खेकडे उधार घेतले. त्याचे पैसे मागण्यासाठी गोविंद महिलेच्या घरी गेला. त्यावेळी महिलेने ‘पती पैसे सुट्टे करण्यासाठी गेले आहेत. त्यांनी सुट्टे पैसे आणले की तू तुझे खेडक्याचे पैसे घेऊन जा’ असे सांगितले. यावेळी गोविंद याने तिच्याशी अश्लील भाषेचा वापर करून त्यांचा विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.