Chikhali : तक्रार मागे घे म्हणत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत एकाने विधवा महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केलं. ही घटना शनिवारी (दि.20) सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली.

नितीन दगडू रोकडे याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेच्या पतीने निधन झाल्यानंतर पतीच्या नावावर असलेली वडिलोपार्जीत जमीन पिडीतेच्या नावावर करुन देतो म्हणत आरोपीने मागील दिड वर्षात सुमारे वेळोवेळी हात ऊसने तीन लाख रुपये घेतले. ते पैसे परत न दिल्यामुळे पिडीतेने आरोपी विरोधात पोलीसात तक्रार दिली होती. मात्र याचा राग मनात धरून आरोपी पिडीतेला त्रास देत होता.

यातून शनिवारी पिडीता चिखली येथे आली असता आरोपी तेथे ज्युस पित उभा होता. त्याने तिथेच पिडीतेला धमकवण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्‍लिल भाषा वापरत गैर वर्तणुक करत पिडीतेचा विनयभंग केला. हातातील काचेच्या ग्लासने पिडीतेच्या डोक्‍यात मारला यामध्ये त्या जखमी झाल्या. तसेच पुन्हा पोलीसाकडे तक्रार केली तर तुला व तुझ्या मुलीला बघून घेईन अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.