Dehuroad : रस्त्यात महिलेचा विनयभंग; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – रस्त्याने चाललेल्या महिलेसमोर उभा राहून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करणा-या एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

शिवराम हिरन्ना भंडारी (वय 50, रा. चिंचोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 10 मे रोजी फिर्यादी महिला देहूरोड बाजारातील हॉटेल अशोक समोरून चालली होती. यावेळी आरोपी भंडारी हा तिच्यासमोर आला. अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. देहूरोड ठाण्याच्या फौजदार छाया बोरकर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.