Jansanvad Sabha : सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवारी जनसंवाद सभा!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Jansanvad Sabha) सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजन करण्यात येते. मात्र येत्या सोमवारी 16  मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवारी होणारी जनसंवाद  सभा मंगळवार 17 मे रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत  होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन येत आहे. आतापर्यंत आठ सभा पार पडल्या असून यामध्ये सुमारे एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. जनसंवाद सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या (Jansanvad Sabha) करण्यात आल्या आहेत.

PCMC Election 2022: महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध!

यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – बांधकाम परवानगी सह शहर अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रिय कार्यालय – भूमी आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठाणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे (Jansanvad Sabha) अध्यक्षस्थान भुषवत आहेत.

संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित राहतात. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारींचे निराकरण करतात.

https://www.youtube.com/watch?v=MEsfxbEdzsQ&t=1s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.