Technology News  : व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवता येणार पैसे 

एमपीसी न्यूज  : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp) युजर्स आता भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आता कोणत्याही दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजरला यूपीआय आयडीमध्ये (UPI ID) पैसे पाठवता येणार आहेत. यूपीआय पेमेंट सर्व्हिस लाँच करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) मंजुरी मिळाली आहे.

 

WhatsApp कडून गेल्या अनेक काळापासून यूपीआय सिस्टमचं परीक्षण सुरू होतं. परंतु प्रायव्हसी प्रकरण अडकलं होतं. एनपीसीआयने गुरूवारी व्हॉट्सअ‍ॅप पेला लाईव्ह करण्याची परवानगी फेज वाईज दिली आहे. सध्या केवळ 20 लाख युजर्सच या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकणार आहेत.

 

सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 200 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच झाल्यामुळे यूपीआय पेमेंट मार्केटमध्ये फोन पे, पेटीएम, गुगल पे यांना मोठी टक्कर मिळणार आहे.

 

 UPI

यूनिफायइड पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआय एक रियल टाईम पेमेंट सिस्टम आहे. ज्याने मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये पैसे त्वरित ट्रान्सफर करू शकतो. यूपीआयच्या माध्यमातून एका बँक अकाउंटला अनेक यूपीआय अ‍ॅप लिंक करू शकता. अनेक बँक अकाउंटला एका यूपीआय अ‍ॅपद्वारे ऑपरेट करता येतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.