Hadapsar : बॅंकेतून 50 हजारांची रोकड काढून घरी परतणा-या इसमाची पैशांची सॅक चोरीला

एमपीसी न्यूज –  बॅंकेतून 50 हजारांची रोकड काढून घरी परतणा-या इसमाची पैशांची सॅक चोरल्याची घटना काल सोमवारी (दि.15) हडपसर येथील कामधेनू इस्टेट शेजारून उषा किरण हॉस्पिटलकडे जाणा-या रोडवर घडली.

याप्रकरणी चेतन रेवी (वय 36, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन यांनी बॅंकेतून 50 हजारांची रोकड काढली व ती रक्कम सॅकमध्ये ठेवून  आपल्या घरी जात असताना पाठीमागून एक अनोळखी इसम आला आणि त्याने फिर्यादीला तुमच्या शर्टवर काहीतरी घाण पडली आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आपला शर्टवरची घाण साफ करण्यासाठी शर्ट काढला व पैशांची सॅक बाजूला ठेवून शर्ट साफ करण्यात व्यस्त असताना त्यांची  पैशांची सॅक त्या अज्ञात इसमाने चोरून नेली.

या प्रकरणी स्टेशन येथे अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.