Technology News : ‘गुगल पे’ वर इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंटसाठी मोजावे लागणार पैैसे 

एमपीसी न्यूज  :  डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या ‘गुगल पे’ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम पुरविली जाणार आहे. याकरता वापरकर्त्यांना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान, हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

 
सध्या गुगल पे मोबाइल किंवा पे.गुगल.कॉम या वेबसाईटवरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलकडून वेब अॅप बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी वापरकर्ते 2021 च्या सुरुवातीपासून पे गुगल अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. याकिरता युजर्सना गुगल पेचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे, गुगल पेचा सपोर्ट पेजदेखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केला जाईल, अशी घोषणा गुगलने केली आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता तेव्हा पैसे हस्तांतरित होण्यास एक ते तीन दिवस लागतात. मात्र, डेबिट कार्ड वापरून पैसे त्वरित हस्तांतरित केले जाते. मात्र, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते. यामुळे कडूनही इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. गुगलकडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि IOS युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. कंपनीने गुगल पेच्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.