Monsoon alert: पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज:  महाराष्ट्रात आता हळूहळू पाऊस जोर धरू लागला आहे. ( Mansoon alert) अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुढील चार दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. काल दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Startup Ranking: राज्याच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’*

सध्या मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघरवर मध्यम ते तीव्र तीव्रतेचे ढग असून पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

उत्तर ओडिशा आणि लगतच्या दक्षिण झारखंडवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील पावसावर होणार आहे. (Monsoon alert) पुढील चार दिवसांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.