Monsoon Arrive : मान्सूनचे अंदमानात आगमन

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांसह ज्याची प्रतिक्षा करीक होते तो मान्सून आज अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात दाखल झाला.

यंदा मान्सून जवळपास आठवडाभर आधीच अंदमानात दाखल झाला आहे.खालच्या उष्णकटीबंधीय पातळीमध्ये नैऋत्य दिशांना बळकटी देण्याच्या दृष्टीने व्यापक पर्जन्य क्रियाकलाप आणि परिसरातील सतत ढगाऴपणा यामुळे नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरातील काही भागात अंदमान निकोबर बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान समुद्रात पोहचला आहे.

 

मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात,संपूर्ण अंदमान समुद्र आणि अंदमान बेटे आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील 2-3 दिवसांत पुढे जाईल अशी अनुकूल स्थिती आहे. पुढील पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसऴधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.त्याशिवाय 16 ते 18 मे दरम्यान अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि पुर्व मध्य बंगालच्या उपसागरात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.