Weather Update : केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन, सरासरीच्या 98 टक्के पाऊस

एमपीसी न्यूज : हवामान विभागाने  केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन 1 जून रोजी केरळवर होत आले आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये हवामान विभागाने 1 जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याचे 5 जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी 15 मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो.

यंदा तो 14 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे वारे हे 21 मेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात 22 मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.