T 20 Cricket : ‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाची सलग दोन विजयांची कामगिरी

एमपीसी न्यूज – एजीएएस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘ मान्सून  लीग’ अजिंक्यपद टी – २० क्रिकेट स्पर्धेत (T 20 Cricket)  ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची कामगिरी केली.

 

 

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत (T 20 Cricket) क्षितीज आपटे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा ८२ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १३९ धावा जमविल्या. कर्णधार तनिष्क ठाकरे (३२ धावा), उत्कर्ष चौधरी (२५ धावा) आणि पवन आनंद (२० धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना फार्मा इलेव्हनचे फलंदाज एका पाठोपाठ बाद होत गेले आणि त्यांचा डाव ५७ धावांवर गुंडाळला गेला. ग्लोबल वॉरीयर्सच्या क्षितीज आपटे याने १४ धावात ३ तर, क्षितीज कबीर (३ – १५) व अजय पाटील (२ – ११) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

 

 

Squash tournament : सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे 29 जूनपासून आयोजन

 

उत्कर्ष चौधरी याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर (T 20 Cricket) ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघाचा ५८ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. ग्लोबल वॉरीयर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०८ धावांचा डोंगर उभा केला. उत्कर्ष चौधरी (नाबाद ५१ धावा), क्षितीज कबिर (नाबाद ३५ धावा), मनीज शेजवळ (३६ धावा), तनिष्क ठाकरे (३२ धावा) आणि ऋतुराज वीरकर (३१ धावा) यांच्या फलंदाजीमुळे २०० धावांचा टप्पा पार केला. याला उत्तर देताना फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव १५० धावांवर मर्यादित राहीला.

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी –

 

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब – १९.३ षटकात १० गडी बाद १३९ धावा (तनिष्क ठाकरे ३२, उत्कर्ष चौधरी २५, पवन आनंद २०, अंकित जैन ३-१३, अमोल लहासे ३-२९) वि.वि. फार्मा इलेव्हन – १५ षटकात १० गडी बाद ५७ धावा (अमोल करमपुरी २५, आनंद नाजन १०, क्षितीज आपटे ३-१४, क्षितीज कबीर ३-१५, अजय पाटील २-११); सामनावीरः क्षितीज आपटे;

 

 

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब – २० षटकात ५ गडी बाद २०८ धावा (उत्कर्ष चौधरी नाबाद ५१ (२७, ४ चौकार, ३ षटकार), क्षितीज कबिर नाबाद ३५, मनीज शेजवल ३६, तनिष्क ठाकरे ३२, ऋतुराज वीरकर ३१, अभिषेक बोधे २-३८) वि.वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब – १८.२ षटकात १० गडी बाद १५० धावा (आशिष घमांडे ३६, अनिल मांडके १८, उत्कर्ष चौधरी २-१६, अजय पाटील २-२७); सामनावीरः उत्कर्ष चौधरी;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.