Monsoon League: गेम स्विंगर्सची विजयी सलामी; फार्मा इलेव्हन संघाचा तिसरा विजय !

‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज: एजीएएस मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत गेम स्विंगर्स संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Monsoon League) तर फार्मा इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अभय चौगुले याच्या 65 धावांच्या जोरावर गेम स्विंगर्स संघाने जोशी स्पोर्ट्स इलेव्हनचा 26 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गेम स्विंगर्स संघाने 20 षटकात 204 धावांचा डोंगर उभा केला. अभय चौगुले (65 धावा) यासह रणजीत कुलकर्णी (40 धावा), सचिन कांगरकर (26 धावा) आणि शैलेश साठे (27 धावा) यांनी फलंदाजीमध्ये संघासाठी योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना जोशी स्पोर्ट्स इलेव्हनचा डाव 20 षटकात 178 धावांवर मर्यादित राहीला. कुणालसिंग चौहान (93 धावा) आणि अक्षय शिंदे (52 धावा) यांनी अर्धशतकी खेळी करत प्रतिकार केला.

गणेश आंब्रे याच्या 80 धावांच्या खेळीमुळे फार्मा इलेव्हन संघाने सुप्रिम इलेव्हनचा 194 धावांनी धुव्वा उडविला. प्रथम फलंदाजी करताना फार्मा इलेव्हनने 262 धावांचा डोंगर उभा केला. गणेश आंब्रे (80 धावा) आणि विक्रम माळी (59 धावा) या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी 56 चेंडूत 111 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. (Mansoon League) यानंतर विक्रम याने विलक्षण दडवाल (नाबाद 41 धावा) याला साथीला घेत 29 चेंडूत 76 धावांची वेगवान भागिदारी करून संघाला 262 धावांचे आव्हान उभे करून दिले. याला उत्तर देताना सुप्रिम इलेव्हनचा डाव 68 धावांवर गुंडाळला गेला.

Chikhali News: घरकुलमधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
गेम स्विंगर्सः 20 षटकात 6 गडी बाद 204 धावा (अभय चौगुले 65 (36, 8 चौकार, 3 षटकार), रणजीत कुलकर्णी 40, सचिन कांगरकर 26, संकेज जोशी 23, शैलेश साठे 27, गणेश जोशी 3-30) वि.वि.

जोशी स्पोर्ट्स इलेव्हनः 20 षटकात 5 गडी बाद 178 धावा (कुणालसिंग चौहान 93 (52, 7 चौकार, 5 षटकार), अक्षय शिंदे 52 (38, 3 चौकार, 3 षटकार), अन्वरहुसेन मालगवे 2-20); सामनावीरः अभय चौगुले;

फार्मा इलेव्हनः 20 षटकात 4 गडी बाद 262 धावा (गणेश आंब्रे 80 (40, 13 चौकार, 2 षटकार), विक्रम माळी 59 (39, 10 चौकार), विलक्षण दडवाल नाबाद 41 (17, 5 चौकार, 2 षटकार), शोएब खान 1-42);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी गणेश आणि विक्रम यांच्यात 111 (56); चौथ्या गड्यासाठी विक्रम आणि विलक्षण यांच्यात 76 (29चेंडू)

वि.वि. सुप्रिम इलेव्हनः 13.1 षटकात 10 गडी बाद 68 धावा (आकाश अलुकूंटे 30, तुषार माडीवाले 3-12, सुदर्शन गुणे 2-6); सामनावीरः गणेश आंब्रे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.