Pimpri : वल्लभनगर आगारांतून साडेतीन शक्तीपीठ दर्शऩासाठी जादा बस सोडणार

अॅडव्हान्स बुकिंग सुरु

एमपीसी न्यूज – नवरात्र उत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनसाठी जादा बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वल्लभगर आगार व्यवस्थापक एस. एन. भोसले व वाहतुक नियंत्रक आर.टी. जाधव यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

येत्या 12 ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता बसचा प्रवास सुरु होईल. कोल्हापूरमधील दर्शन झाल्यानंतर या बसचा तुळजापूरला मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी (दि. 13) तुळजापूरनंतर माहूर येथे बसचा मुक्काम असणार आहे. तिसऱ्या दिवशी (दि. 14 ) नाशिक, वणी येथे दर्शन होईल. त्यानंतर बसचा पिंपरी-चिंचवडसाठी परतीचा प्रवास सुरु होईल. याचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.

या बस सेवेचे “ऑनलाईन अॅडव्हान्स बुकिंग’ उपलब्ध आहे. भाविकांनी “ग्रुप’ने “बुकिंग’ केल्यास गावातून जाण्यासाठी व परत येण्यासाठी बस सोडण्यात येईल. मागील वर्षी साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी तीन गाड्या सोडण्यात आल्या होत्या, त्यातून दोन लाख उत्पन्न मिळाले. यावर्षी 5 गाड्या सोडण्यात येणार असून 4 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. यासाठी तिकिट दर प्रौढांसाठी 2295 तर मुलांसाठी 1150 रुपये असा राहील. अंध व अपंग यांच्यासाठी तिकिटदरामध्ये 75 टक्के सवलत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्के सवलत असणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगसाठी www.msrtc.ors या संकेतस्थळांवरुन किंवा 020-7420300 व 7420007 यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.