Pimpri News: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त, आज 944 बरे, 721 नवीन रुग्ण, 12 मृत्यू

More corona-free patients than new patients, 944 cured today, 721 new patients, 12 deaths.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला. तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून आज एकाच दिवशी 944 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील 679 आणि पालिका हद्दीबाहेरील 42 अशा 721 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 29 हजार 836 झाली आहे.

आज 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपरीतील 80 वर्षीय महिला, इंद्रायणीनगर येथील 50 वर्षीय पुरुष, दिघीरोड भोसरीतील 78 वर्षीय वृद्ध, पिंपळेगुरव येथील 45 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 49 वर्षीय महिला, चिंचवडगावातील 65 वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुपीनगर तळवडेतील 52 वर्षीय पुरुष आणि देहुगाव मधील 80 वर्षीय वृद्ध, तसेच पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण रुपीनगर येथील 35 वर्षीय महिला, निगडीतील 75 वर्षीय पुरुष, सांगवीतील 67 वर्षीय महिला, चिखलीतील 51 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 29 हजार 836 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 21, 208 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 496 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 117 अशा जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5146 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.