Pune : पुण्यात मेट्रोचे जाळे पसरणार ; सहा मार्गांवर डीपीआर करण्यास मंजुरी

एमपीसी न्यूज- पुणे शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून होत असतांना आता शहरात मेट्रोचे जाळे पसरविण्याचे काम सुरु झाले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची घाईच सत्ताधारी पक्षाला झाल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्याभरात स्थायी समितीने जवळपास तब्बल सहा मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर आराखडा (डीपीआर) करण्यास मंजुरी दिली आहे.

मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वारगेट ते खडकवासला मेट्रोचा प्रस्ताव भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी मंडल. यात एक विशेष बाब म्हणजे महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हीच मागणी केली होती. त्यानंतर भाजप नगरसेवकाकडून घाईघाईने हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचबरोबर स्वारगेट ते हडपसर या मार्गाचा प्रस्ताव भाजपच्या रंजना टिळेकर यांनी तर कात्रज ते वारजे-शिवणे असा मेट्रोचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांनी मांडला. यासर्व मार्गाच्या डीपीआर करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.