India Corona Update : गेल्या 24 तासांत बरे झालेल्यापेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज – देशात दिवाळीनंतर नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत 45 हजार 209 नवीन रुग्णांची वाढ झाली असून, 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90 लाख 95 हजार 807 एवढी झाली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 85 लाख 21 हजार 617 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 40 हजार 962 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 501 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 33 हजार 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात आतापर्यंत 13 कोटी 17 लाख 33 हजार 134 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 10 लाख 75 हजार 326 नमूणे हे शनिवारी (दि.21) तपासण्यात आले आहेत आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरातून 43 हजार 493 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 93.68 टक्के एवढा आहे तर, मुत्यूदर 1.46 टक्के एवढा आहे.

अमेरिकेतील फार्मा कंपनी मॉडर्नाने आपली लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे. लस चाचणीच्या प्राथमिक निष्कर्षानंतर कंपनीने हा दावा केला. मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात प्रभावी असल्याचे आढळून आली आहे. मॉडर्नाच्या लशीच्या किंमतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.