Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी बरे होणा-या रुग्णापेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक 

एमपीसी न्यूज – राज्यात शुक्रवारी (दि.11) बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ झालेल्या रुग्णापेक्षा कमी आहे. शुक्रवारी राज्यात 11 हजार 766 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, 8 हजार 104 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 1 लाख 61 हजार 704 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 87 हजार 853 इतका झाला आहे. त्यापैकी 56 लाख 16 हजार 857 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 95.45 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात 406 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 06 हजार 367 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.81 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 76 लाख 11 हजार 005 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 10 लाख 04 हजार 770 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 024 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.