India Corona Update : गेल्या 24 तासांत दिड लाखांहून अधिक रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाखांच्या पुढे 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत दिड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. 24 तासांत तब्बल 1 लाख 52 हजार 879 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 11 लाख 08 हजार 087 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 33 लाख 58 हजार 805 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 20 लाख 81 हजार 443 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 90 हजार 584 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 90.43 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 839 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.26 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 25 कोटी 66 लाख 26 हजार 850 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 12 हजार 047 चाचण्या शनिवारी (दि.10) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात आजपासून लसीकरण महोत्सवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. नागरिकांनी लस घ्यावी तसेच खबरदारी म्हणून मास्क परिधान करावे आणि गरज पडल्यास चाचणी करावी असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आजपर्यंत देशात 10 कोटी 15 लाख 95 हजार 147 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.