Mumbai : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील गुन्ह्यांचा आकडा एक लाखाच्या पुढे

more than 1 lakh cases filed by maharashtra police in the state for violating the lockdown amid coronavirus pandemic.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हा गुन्ह्यांचा राज्यातील आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये सुमारे 20 हजार जणांना अटक केल्याचेही ते म्हणाले.

प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार 1 लाख 4 हजार 449 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 19 हजार 838 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 56 हजार 473 वाहने जप्त केली आहेत. यात नियमभंग करणाऱ्यांकडून लॉकडाऊनच्या कालावधीत 3 कोटी 97 लाख 87 हजार 644 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले –
# लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या 212 घटना घडल्या आहेत. त्यात 750 जणांना अटक करण्यात आली आहे.
# राज्यात 2 लाख 58 हजार 792 नागरिकांना क्वारंटाईन केले आहेत. त्यातील 662 जणांवर क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

# राज्य शासनाने 4 हजार 19 निवारा केंद्रांमध्ये 3 लाख 88 हजार 944 विस्थापित, कामगारांची सोय केली आहे. त्या विस्थापित कामगारांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात आहेत.
# बेकायदेशीर वाहतुकीचे 1 हजार 291 गुन्हे घडले आहेत.
# राज्यातील 819 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.