Chinchwad : चिंचवड येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहतूककोंडी

यात सुमारे २५ वाहने घसरली, त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली.

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील थरमॅक्स चौक ते केएसबी चौक येथे टँकरमधून ऑईल सांडल्याने वाहनांची चांगलीच घसरगुंडी झाल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. यात सुमारे २५ वाहने घसरली.  त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली.

याबाबत अमित गोरखे यांनी दिलेली माहिती अशी, आज दुपारी थरमॅक्स चौक ते केएसबी चौक दरम्यान एका टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने रस्ता तेलकट आणि निसरडा झाला. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी सुमारे 20 ते 25 वाहने घसरली. याची माहिती तात्काळ निगडी पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली.

पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन, भोसरी, तळवडे, प्राधिकरण, चिखली अग्निशमन विभागाचे प्रत्येकी एक असे एकूण सहा बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. सुरुवातीला पाणी मारून रस्ता धुवून काढला. तरीही रस्त्यावरील तेलकटपण जात नसल्याने झाल्याने त्यावर मुरूम टाकला. काही तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरु झाला. दरम्यान, थरमॅक्स चौक ते केएसबी चौक दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. काही तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांनी वेळीच येत वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.