Maharashtra Political Crisis : आपल्यासोबत 50 पेक्षा जास्त आमदार – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 पेक्षा जास्त आमदार असल्याचे एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले आहे. यामध्ये शिवसेनेचे जवळपास 40 आमदार असून ते सर्वजण (Maharashtra Political Crisis)  आसाममध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार जाण्याचा सिलसिला अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे.

 

Maharashtra Political Crisis : धमक्यांना भीक घालत नाही – एकनाथ शिंदे

 

ज्यांचा आमच्या भूमिकेवर विश्वास आहे ते आमच्या गटात सामील होतील. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेणारे आहोत, असे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडलेली नाही, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 

 

 

आपल्याला अपात्र ठरविण्याचे पत्र जे शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष (Maharashtra Political Crisis)  नरहरी झिरवळ यांना दिले आहे ते बेकायदा असल्याचे शिंदे म्हणाले.काल आपल्याला दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे, कारण बहुसंख्य आमदार आपल्या बाजूने आहेत.ते आपल्याला या प्रकारची नोटीस देऊ शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.