Pune : जगभरातून तब्बल 56 लाखांहून अधिक गणेशक्तांनी घेतले ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे ऑनलाईन दर्शन

एमपीसी न्यूज – नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर तब्बल 56 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे (Pune) आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन प्रत्यक्ष घेता आले नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक घेत आहेत. ट्रस्टतर्फे विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
Chinchwad : चिखलीमधील चंदनशिवे, दिघीतील गडकर आणि शिरगाव येथील गायकवाड टोळ्यांवर मोका
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune) सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाईटवरुन हजारो भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईटवरुन दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती व दर्शन देखील गणेशभक्त घेत आहेत.
भारतातील पुण्यासह मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक, ठाणे, गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, कोल्हापूर, नेपाळमधील काठमांडू आदी शहरांमधून ऑनलाईन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.
सुमारे 34 लाख 69 हजार भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर 21 लाख 77 हजार यांसह18 हजारहून अधिक यूटयूब व अॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल 56 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.