India Corona Update : चोवीस तासांत एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण, 478 मृत्यू 

0

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशात नव्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ झाली असून, तब्बल 1 लाख 03 हजार 558 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 067 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 82 हजार 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 52 हजार 847 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92.79 टक्के एवढा झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

देशातील सक्रिय रुग्णांची 7 लाख 41 हजार 830 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.31 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 24 कोटी 90 लाख 19 हजार 657 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 93 हजार 749 चाचण्या रविवारी (दि.04) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 7 कोटी 91 लाख 05 हजार 163 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment