India Corona Update : गेल्या 24 तासांत साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण, तर 2,812 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत साडेतीन लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 2 हजार 812 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 3 लाख 52 हजार 991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 73 लाख 16 हजार 163 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 43 लाख 04 हजार 382 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 19 हजार 272 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 82.62 टक्के एवढा झाला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 28 लाख 13 हजार 658 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 2 हजार 812 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 95 हजार 123 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 27 कोटी 93 लाख 21 हजार 177 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 02 हजार 367 चाचण्या रविवारी (दि. 25) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. देशात एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. या लसीसाठी पात्र असलेल्या 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.