India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (दहा मुद्दे)

एमपीसी न्यूज – भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाची तिसऱ्या लाटेची भिषणता आता समोर येऊ लागली आहे. 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 47 हजार 254 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आहे. गुरुवारपेक्षा 29,722 अधिक रुग्ण वाढले आहेत.

2. देशात सध्या 20.18 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. भारताचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.94 टक्क्यांवर पोहोचला आहे.

4. देशात आतापर्यंत 9,692 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत काल पेक्षा 4.36 टक्के अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.

5. गेल्या 24 तासांत देशभरात 703 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

6. चोवीस तासांत 2 लाख 51 हजार 777 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 93.50 टक्के एवढा आहे.

7. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 71.15 टक्के प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 19.35 लाख चाचण्या पार पडल्या.

8. देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी 3 लाख 17 हजार 532 रुग्ण आढळून आले होते.

9. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

10. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 160.43 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.