Morocco News : अहो अश्चर्यम ! 25 वर्षीय महिलेनं एकसाथ नऊ बालकांना दिला जन्म

(फोटो फेसबुकवरून)

एमपीसी न्यूज – माली, मोरक्को येथील 25 वर्षीय महिलेनं एकसाथ नऊ सदृढ बालकांना जन्म दिला आहे. हलिमा सिसे असे या महिलेचे नाव आहे. खास देखभाल करण्यासाठी माली सरकारने तिला मोरक्को येथील हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. सध्या या घटनेची जगभर चर्चा होत आहे. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, एन बोर्जा क्लिनिक मध्ये हलिमाने नऊ मुलांना जन्म दिला आहे. दहा डॉक्टर, पंचवीस नर्स आणि वैद्यकीय स्टाफ यांनी मिळून ही डिलिव्हरी यशस्वी केली. सर्व बालकांचे वजन 500 ग्रॅम पासून एक किलो पर्यंत आहे. मुलांना दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीसाठी इन्क्युबेटर मध्ये ठेवले जाणार आहे.

हलिमा यांच्या प्रेगन्सीची सर्व मालीमध्ये चर्चा होती. मुलांची योग्य काळजी घेतली नाही तर, मुलं जगणार नाहीत अशी चिंता व्यक्त केली जात होती. त्या दृष्टीकोनातून हलिमा यांना मोरक्को येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 30 मार्चला त्या मोरक्को येथे दाखल झाल्या आणि पाच आठवड्यांनी ‘सी सेक्शन’ ऑपरेशन द्वारे त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला.

 

यापूर्वी 2009 साली अमेरिकेत एका महिलेने आठ मुलांना जन्म दिला होता. यासाठी त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. आज त्यांची मुले 12 वर्षाची आहेत. तसेच, 1971 साली ऑस्ट्रेलिया व 1999 साली इन्डोनेशिया मध्ये महिलांनी नऊ मुलांना जन्म दिला होता. पण, त्यांची मुले फार काळ जिवंत राहिली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.