_MPC_DIR_MPU_III

Pune : मेजर शशिधरण नायर यांचे पार्थिव खडकवासला येथील घरी

भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमला परिसर

एमपीसी न्यूज – काश्मिरातील सीमेवर भारतमातेचे रक्षण करताना शहीद झालेले मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या खडकवासला येथील घरी आणण्यात आले. यावेळी भारत माता की, मेजर शशीधरन नायर अमर रहे या घोषणानी संपूर्ण खडकवासला परिसर दुमदुमुन गेला होता.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

नायर यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने विधी सुरू आहेत. त्यांना  शासकीय मानवंदना देण्यासाठी लष्कराचा बँडही उपस्थित आहे. तर जमलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. नायर यांच्या हौतात्म्यने संपूर्ण खडकवासलावर शोककळा पसरली आहे. नायर यांच्या पार्थिवावर सकाळी 10 नंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

यावेळी खडकवासला येथील नायर यांच्या घराजवळ ग्रामीण पोलीस दलातील जवान उपस्थित, लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिवाय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार भीमराव तापकीर, खडकवासलाचे सरपंच सौरभ मते हेही उपस्थित आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.