Morwadi News: मोरवाडीत रविवारी रक्तदान व आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त उद्या (रविवारी) रक्तदान, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एसएनबीपी स्कूल म्हाडा मोरवाडी येथे रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या वेळेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर होणार आहे.

महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार आहे.

धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर, उद्योजक विजयराज पिसे, डॉ. दिनेश गाडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना कालावधीमध्ये रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. महापालिका व वायसीएम रुग्णालयाकडून रक्तदानाचे आवाहन केले जाते. त्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे आयोजक, महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

स्वराज्य ग्रुप म्हाडा, मनित मित्र मंडळ, विघ्नहर्ता प्रतिष्ठान, आरंभ सोशल फाऊंडेशन, मैत्री बौध्द विहार लालटोपीनगर, म्हाडा परिवार मोरवाडी आणि धनगर समाज बांधव पिंपरी-चिंचवड शहर यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.