BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मोरया’च्या गजरात मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेस प्रारंभ (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – श्री मोरया गोसावी समाधी मंदिरापासून मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला रविवारपासून (दि. 12) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 
श्रावण महिन्यात पहिले चार दिवस द्वारयात्रा दरवर्षी करण्यात येते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने या द्वारयात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. मंगलमूर्तीची नित्यपूजा मंदार देव यांच्या हस्ते झाल्यानंतर द्वारयात्रेस एक हजार दुर्वा वाहून संकल्प सोडण्यात येतो.  यावेळी मंदार देव महाराज, शेखर रबडे गुरुजी, चिंतामणी धुपाआरती, नारायण लांडगे, गंगाधर जाधव, मनोहर बेणारे, शेखर बोरकर, मंदार चिंचवडे, व चिंचवड देवस्थानचे भक्तगण सर्व सदस्य उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संजीवन समाधी मंदिरात ही पालखी जाते. याठिकाणी समाधीजी पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा करुन सर्वभक्त द्वारयात्रा प्रारंभ होतो.
चिंचवड देवस्थानच्या चार दिशांना चार सीमाद्वारे आहेत. पूर्वेकडे पिंपरी रस्त्यावर मांजराई व राममहेश, दक्षिणेला वाकड रस्त्यावर आसराई व उमामहेष, पश्‍चिमेला रावेतचा रामाडीचा डोंगर या ठिकाणी ओझराई व रतीकंदर्प आणि उत्तरेला आकुर्डी येथे मुक्ताबाई व महीवराह या देवता आहेत. त्यामुळे नागपंचमीचे आमंत्रण करण्यासाठी द्वारयात्रा काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता मंदिरापासून पिंपरी येथील मांजराई देवी मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

श्री मंगलमूर्ती वाडा ते श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, गांधी पेठ, चापेकर चौक, लोकमान्य रुग्णालय, चिंचवड रेल्वे पूल, मुंबई-पुणे रस्त्याने प्रीमिअर कंपनी, एम्पायर इस्टेट मार्गे श्री मांजराई देवी मंदिर या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी  जोगवा गोंधळ ही दोन देवीची पदे पारंपारिक पद्धतीने म्हटली जातात. यानंतर प्रसाद वाटप झाले. मोरया गोसावी समाधी मंदिरात ही पालखी येते. व चिंतामणी महाराजांच्या समाधीसोर पारंपारिक पदे म्हणण्यात आली. गणेशभक्‍त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिरवणुकीत पांढऱ्या पताकानिशी चांदीची काठी घेतलेले चोपदार, सोबत छत्रीधारी आणि पितांबरधारी सेवक सहभागी झाले होते.

  

https://www.youtube.com/watch?v=vwinC1n1hQk&feature=youtu.be
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like