Moshi : आरटीओच्या 23 पदांना मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील 23 पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने या मुदतवाढीला नुकतीच मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण 23 पदांचा समावेश आहे. राज्यभरातील 812 अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण 23 पदांचा समावेश होता. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा या पदांना पुन्हा 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड कार्यालयातील पाच मोटार वाहन निरीक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक रोखपाल, वाहनचालक, शिपाई व पहारेकरी प्रत्येकी दोन पदे आहेत. याशिवाय मुख्य लिपिक (ग्रामीण), कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल (ग्रामीण), मुख्य रोखपाल, लिपिक टंकलेखक, वाहन तपासणीस, नाईक आणि स्वच्छक या संवर्गातील प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे. यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.