_MPC_DIR_MPU_III

Moshi : मानाच्या विड्यासाठी तब्बल 23 लाखांची बोली

एमपीसी न्यूज – नागेश्वर महाराजांच्या उत्सवास महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. नुकताच नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात परंपरागत लिलाव पार पडला. उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे. मोशीतील नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून लिलालाला सुरुवात झाली. शेवटचा मानाचा विडा हवेली सह. बँकेचे विद्यमान संचालक विजू सस्ते (पा) यांनी मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्र्वर महाराजांचा शेवटचा ‘विडा’ 23,00000/-(अक्षरी-तेवीस लाख रुपये)ला घेतला. तर मोशी गावचे युवानेते निलेश बोराटे यांनी नागेश्र्वर महाराजांचे शेवटचे पवित्र लिंबू चार लाख रुपयाला घेतले.

_MPC_DIR_MPU_IV

मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात झाली असून भंडारा उत्सवामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. यात्रेत सर्वप्रथम भंडारा उत्सव, उरुस, लिलाव, आखाडा असे स्वरुप असते. भाविकांनी मंगळवारपासून मंदिर परिसर आणि आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती.

_MPC_DIR_MPU_II
  • यात्रा कालावधीमध्ये गावातील शिवाजी महाराज प्रवेशद्वार, मंदिरे, शाळा इमारतीवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती. भंडा-याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी आणि शेकभाजी महाप्रसादाचे आय़ोजन केले होते. बुधवारी आमराईमध्ये होम-हवन, महापूजा, आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरु झाली.

आज गुरुवारी सुरु झालेल्या लिलावासाठी ग्रामस्थांनी सकाळपासून मंदिरात हजेरी लावली होती. उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो. यामध्ये महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. ग्रामस्थांकडून महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.

  • मोशी गावचे युवानेते नितिन सस्ते(पा) आणि हवेली सह. बँकीचे विद्यमान संचालक विजू सस्ते (पा) यांनी मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्र्वर महाराजांचा शेवटचा ‘विडा’ घेतला 23,00000/-(अक्षरी-तेवीस लाख रुपये)ला आणि मोशी गावचे युवा उद्योजक संतोष सस्ते(पा) यांनी नागेश्र्वर महाराजांची शेवटची वटी घेतली रु 12,50,000/-(अक्षरी-बारा लाख पन्नास हजार रुपायाला) आणि मोशी गावचे युवानेते निलेश बोराटे यांनी नागेश्र्वर महाराजांचे शेवटचे पवित्र लिंबू 4,00000/-(अक्षरी-चार लाख रुपयाला) घेतले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.