Moshi : शिवीगाळ करत आपसात भांडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करत एकमेकांसोबत भांडण करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री सव्वा नऊच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी येथील सार्वजनिक मोकळ्या जागेत घडली.

शीतल सुहास पांढरपट्टे, सागर अरुण पोटे, प्रल्हाद अरुण पोटे, स्नेहल प्रल्हाद पोटे (सर्व रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संजय बबन भागवत यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी रात्री मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षातून कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी येथील सार्वजनिक मोकळ्या जागेत भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. फिर्यादी त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करत असताना आढळून आले.

पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांवरही गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात आणून समजपत्र देऊन सोडण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.