Moshi : अल्पवयीन मुलीसोबत लिफ्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत लिफ्टमध्ये (Moshi) गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना रविवारी (दि.4) मोशी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी (दि.7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मनोज मुरलीधर पवार (वय 30 रा. ओटास्कीम निगडी) याच्या विरोधात बाललैगींक अत्याचाराचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ही तिच्या काकांच्या घरी जात असताना आरोपीने तिच्याशी लिफ्टमध्ये गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला असता, पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Sangvi : सराईत गुन्हेगारांसह दोघांना अटक; घातक शस्त्रे जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.