Moshi : हॉटेलमध्ये ग्राहकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर इतर ग्राहकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोशी-देहू रोडवरील मोशी ग्रँड या हॉटेलमध्ये शनिवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास घडली.

गणेश सस्ते (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. याप्रकरणी अनंत रामचंद्र गोरे (वय 35, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत गोरे यांचे मोशी देहू रोडवर मोशी ग्रँड नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास गणेश सस्ते हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आला. त्याने हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले. जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यानंतर त्याने इतर ग्राहकांसमोर जाऊन असभ्य वर्तन केले.

तसेच ग्राहकांना शिवीगाळ केली. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत हॉटेल मोडून टाकण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.