Moshi : क्रेडीट कार्डव्दारे खरेदी करून पावणे दोन लाखांची फसवूणक

एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्डव्दारे चार लाख 40 हजार रुपयांची खरेदी केली. मात्र, संबंधित कार्डधारकाने याबाबत बँकेला फोन आणि ई-मेलव्दारे माहिती दिली. त्यामुळे दोन लाख 70 हजार रुपयांचे व्यवहार रद्द करण्यात आले असून एक लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार 5 जून 2019 रोजी मोशी येथे घडला.

अमित वसंत घाटे (वय 40, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाटे यांच्या बँकेच्या क्रेडीट कार्डव्दारे अज्ञात आरोपीने नऊ ट्रान्झेक्शन करून चार लाख 40 हजार रुपयांची खरेदी केली. ही बाब फिर्यादी घाटे यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यांनी ट्रान्झेक्शन रद्द केले.

तसेच फिर्यादी घाटे यांनी पेटीएमलाही याबाबत ई-मेलव्दारे माहिती दिली. त्यानंतर लागलीच पेटीएमने देखील ट्रान्झेक्शन रोखून फिर्यादी घाटे यांच्या बँक खात्यात दोन लाख 70 हजार रुपये जमा केले. त्यामुळे चार लाख 40 हजारांपैकी एक लाख 70 हजारांची खरेदी करून आरोपीने फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.