Moshi: भरधाव जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक; एक जण जखमी

Moshi: A speeding car hits a two-wheeler; One person was injured या अपघातात गुरव यांच्या डोक्‍यास व चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे.

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना 24 मे रोजी दुपारी मोशी येथे घडली असून याबाबत १५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास किसन गाडे (वय 55, रा. मु. पो. कऱ्हा वाघज, ता. बारामती, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि.15) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, संभाजी नाना पिंगळे (पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्‍वास विठ्ठल गुरव (वय 47, रा. मु. पो. टेकवडी, ता. पुरंधर, जि. पुणे) असे जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवाशाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या दुचाकीवरून देहू-मोशी रोडने जात होते.

त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एमएच 12 / सीयू 1245 या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गुरव यांच्या डोक्‍यास व चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.