Moshi : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली.

संतोष शिवचंद्र खराडे (वय 29) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश शिवचंद्र खराडे (वय 27, रा. आळंदी रोड, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मोठा भाऊ संतोष हे पुणे नाशिक महामार्गावरील गंधर्वनगरी, मोशी येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात संतोष गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.