Moshi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 29 एप्रिल रोजी शिवाजीवाडी मोशी येथे उघडकीस आली. याबाबत 3 मे 2020 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षित रमेश सदारंग (वय 25, रा. शिवजीवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विराधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदारंग यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम पी 28 / एम सी 7853 ही दुचाकी 28 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या घराजवळ पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्याने सदारंग यांची दुचाकी चोरून नेली. 29 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सदारंग यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.