Moshi : दहशतवाद विरोधी पथकाची मोशी येथे कारवाई; तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

एमपीसी न्यूज – दहशतवाद विरोधी पथकाच्या  (Moshi) पुणे युनिटने बोऱ्हाडेवाडी मोशी येथे कारवाई केली. यामध्ये बांगलादेशी तीन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेजण बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याने सोमवारी (दि. 18) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

सुकांथा सुधीर बागची (वय 21), नयन बिंदू बागची (वय 22), सम्राट बलाय बाला (वय 22, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : महापालिकेने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण गुंडाळले

महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली की, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे एका बांधकाम साईटवर काहीजण बांगलादेश येथून येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कारवाई केली.

पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य  (Moshi) करण्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. हे तिघेजण भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले असल्याचे चौकशी समोर आले.

तिघेजण बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवर काम करत होते. बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघांकडून बांगलादेशी चलन, भारतीय तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.