MoshI : रिक्षा चालकाने महिला प्रवाशाचा मोबाईल पळविला

एमपीसी न्यूज- रिक्षा चालकाला देण्यासाठी सुट्टे पैसे आणण्यास गेलेल्या प्रवाशाचा रिक्षातील मोबाईल घेऊन चालक पसार झाला. ही घटना संतनगर, मोशी येथे 9 ऑक्‍टोबर रोजी घडली.

सविता विलास चांदगुडे (वय 40, रा. पेठ क्रमांक चार, संतनगर, प्राधिकरण, मोशी) यांनी शनिवारी (दि. 12) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच-14-एचएम-0092) या रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता या 9 ऑक्‍टोबर रोजी रिक्षातून आल्या घरी आल्या. रिक्षा चालकाला देण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे त्या पैसे आणण्यासाठी घरी चालल्या होत्या. आपल्या मोबाईल रिक्षातच राहिला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्या धावत रिक्षाकडे आल्या. मात्र रिक्षा चालकाने मोबाईल पाहून भाडे न घेताच मोबाईल घेऊन पळून गेला. पोलीस हवालदार तिटकारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.