Moshi : दुकान मालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या नोकराला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकान मालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या नोकराला तिघांनी मिळून लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोशी येथील एका फॅब्रिकेशनच्या दुकानात घडली.

अक्षय नंदकुमार दभगडे (वय 19, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हर्षवर्धन धोंडीराम शेळके (वय 22), रुपेश रमेश भेंडे (वय 20, दोघे रा. साने चौक, चिखली), प्रणय मंगेश तांदळेकर (वय 19, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचे मालक धनराज नाईकभाऊ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. शनिवारी सायंकाळी आरोपी त्यांच्या दुकानावर आले. आरोपींनी आपसात संगनमत करून धनराज यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी अक्षय हे त्यांच्या बचावासाठी आले. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी अक्षय यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.