Moshi : पूर्ववैमनस्यातून दुचाकी जाळली

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची दुचाकी जाळून टाकण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे मोशी येथे घडली.

नीलेश अशोक फालके (वय 25, रा. गायकवाड वस्ती,मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण पाचपुरे (रा. गोडाऊन चौक, झोपडपट्टी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पाचपुरे आणि फिर्यादी फालके यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून पाचपुरे याने गुरुवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास आपली दुचाकी जाळून 74 हजारांचे नुकसान केल्याचा संशय फालके यांना आहे. याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे कुंटे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.