Moshi : ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे टँकरची धडक ; चार कार आणि आठ दुचाकींचे नुकसान

एमपीसी न्यूज- ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे टँकर चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना टँकरने धडक दिली. यामध्ये चार कार आणि सात ते आठ दुचाकींचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काही ड्रायव्हिंग स्कुलच्या कारचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.