Moshi : रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी गेलेल्या बहिणीच्या घरात तीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी गेलेल्या बहिणीच्या घरात तीन लाखांची चोरी झाली. चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण तीन लाख 8 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 15) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे उघडकीस आली.

हर्षदा नवनाथ कराळे (वय 40, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षदा वकील आहेत. त्या गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास रक्षाबंधनासाठी आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द येथे राहणा-या नणंदेच्या घरी गेल्या. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. घरातून चोरट्याने सोन्याचे गंठण, एक बांगडी, अंगठी, साखळी, एक बालाजीचे पैंडन, दोन कानातले, कानातील मोती टॉप्स, वेडणी असे एकूण 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 लाख 8 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हर्षदा दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.