Moshi: वृक्षारोपण करून वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन साजरा

Moshi: Celebrate vat purnima and World Environment Day by planting trees

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशन आणि संतनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली. कोरोनाच्या काळात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून दोन्ही संस्थांच्या वतीने शुक्रवारी (दि.5) ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच वसुंधरेला हिरवा शालू नेसविण्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने वेळोवेळी वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन केले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संतनगर मोशी प्राधिकरण येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला वड, पिंपळ, कडुनिंब, बकुळ, अर्जुन, करंज अशा वृक्षांचे रोपण करण्यात आले.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी सर्व कार्यकर्त्यांना आहे त्याच ठिकाणी शक्य होईल तिथे वृक्षारोपण करावे. तसेच लोकांना वृक्षारोपण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करून पर्यावरणाच्या कामात सहभागी करावे असे आवाहन केले.

ज्येष्ठ सहकारी कर्नल तानाजी अरबुज, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, राजेश किबिले व भूगोल फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी आपली संस्कृती जतन करीत त्यांच्या सोसायटीजवळ वटवृक्षाची विधिवत पूजा करून वटवृक्षाचे रोपण केले.

शोभा फटांगडे, शिला इचके, रोहिणी हांडे, संगीता मिसाळ, वैशाली मोरे, प्रणीती मोरे, सुनंदा चौधरी, पूजा मिसाळ आदी महिलांनी यात सहभाग घेतला.

विठ्ठल नाना वाळुंज म्हणाले, “येणा-या पावसाळ्यात प्रत्येकाने शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात झाडे लावून त्याचे संवर्धन करावे. वृक्षारोपणाची जबाबदारी घेऊन निसर्गाशी नाते दृढ करुन पर्यावरणाच्या कामाला सुरूवात करावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.